5Hp सोलर पंप 3 लाख 25 हजार रुपये नविन GR आला.

 

    नमस्कार सर्वांना शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सोलर पंप अनुदान योजना सुरू झालेले आहे. आणि यामध्ये आपण जर पाहिले तर या संदर्भातील पाच एचपी च्या सोलर पंपासाठी तीन लाख पंचवीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. आणि यासाठी चा जीआर निर्गमित करण्यात आलेला आहे. तर या लेखामध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचन जेणेकरून यामध्ये दिलेली माहिती आपल्याला समजून येणार आहे. 

 


 

सोलर पंप अनुदान योजना 2022 - solar pump anudan yojna

राज्य शासनाने 7 एप्रिल 2022 रोजी हा महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे. ही योजना आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी समाजाच्या विकासासाठी योजना राबवण्यात येत आहे. महत्त्वाची योजना म्हणजे सिंचनाच्या सुविधा पुरवून शाश्वत कृषी उत्पन्न उत्पन्न वाढीचा लाभ देणे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि या अंतर्गत आदिवासी जमातीतील शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर विहीर बोरवेल यासाठी सोलर पंप देण्यात येणार आहे. आणि हा पंप जर आपण पाहिला तर पाच एचपीचा पंप असणार आहे. वनहक्क कायद्यांतर्गत  वनपट्टे मिळालेले अनुसूचित जमाती शेतकरी लाभार्थी आहेत. अशा शेतकऱ्यांना शेतीला पाणीपुरवठा करण्याकरिता विहिरीचे निर्मिती करणे.  वनपट्टे धारकांचे शेतीला सोलर पंप बसवून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून ही योजना राबवण्यात येत आहे.

सोलर पंप योजना कागदपत्रे - document for solar pump yojana

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक वनपट्टे धारक शेतकऱ्यांसाठी पात्रतेचे निकष व कागदपत्रे. रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे. जातीचा दाखला असणे आवश्यक आहे, व नंतर कायद्याद्वारे वनहक्क प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. सोलर पंप देणे प्रस्तावित आहे त्यासाठी लाभार्थींकडे जलस्रोत उपलब्ध असल्याचा दाखला असणे आवश्यक आहे. यापूर्वी सदर योजनेचा लाभ आदिवासी विकास विभागामार्फत घेतल्या नसल्याबाबतचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. विहीर प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याने भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (शेतकरी सोलर पंप योजना) किमान जमीन क्षेत्र इत्यादी बाबी त्यामध्ये समावेश करण्यात येणार आहे.


नवीन माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

        👇

संकल्प मराठी




युट्युब चॅनेल

        👇

संकल्प मराठी यूट्यूब चॅनल

 

Post a Comment

Previous Post Next Post