बांधकाम कामगार घरकुल योजना २०२२ | अटल बांधकाम कामगार घरकुल/आवास योजना

अटल बांधकाम कागार घरकुल/आवास योजना २०२२

बांधकाम कामगार घरकुल योजना


महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे ग्रामीण भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना घर बांधण्यासाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण) अंतर्गत २ लाख रुपयांची मदत मदत मिळू शकते. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा, अर्ज कोठे करावा, कोणती कागदपत्रे देणे आवश्यक आहे. याची सविस्तर माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

    अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) लाभ घेण्यासाठी दिनांक ०४ जुलै २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेली काल मर्यादा शिथिल केली असून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे दिनांक १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या योजनेसाठी अर्ज करता येईल.

  • अटल बांधकाम कामगार घरकुल/आवास योजना आवश्यक कागदपत्रे - Atal Bandhkam Kamgar Awas Yojana Required Documents.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अटल बांधकाम कामगार आवास योजनेचा (ग्रामीण ) लाभ घेण्यासाठी विहित अर्जासह खालील कागदपत्र देणे आवश्यक आहे:-

  1.     सक्षम प्राधिकाऱ्यांनी नोंदीत बांधकाम कामगार म्हणून दिलेल्या ओळखपत्राची प्रत
  2.     लाभधारकाचे आधार कार्ड –
  3.     लाभधारकाचे स्वताच्या नावाचा ७/१२ चा उतारा / मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र / ग्रामपंचायती मधील मालमत्ता नोंद वहीतील उतारा 
  4.     लाभधारकाचे स्वत:च्या नावावरअसलेल्या बचत खात्याच्या पासबुकाची छायांकीत प्रत

हे पण वाचा

👇

 बांधकाम कामगार योजना 2022 | अर्ज करा लाभ मिळवा

  • अटल बांधकाम कामगार आवास योजने अंतर्गत घराची रचना :-

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी घराची रचना खालील प्रमाणे आहे.

  1. संपूर्ण बांधकाम विटा, वाळू व सिमेंटचे असणे आवश्यक आहे.
  2. जोत्यापासून घराची उंची कमीत कमी १० फूट असावी.
  3. घरकुलामध्ये एक स्वयंपाक घर व बैठक हॉल यांचा समावेश असावा शौचालय व स्नानघर बांधणे अनिवार्य राहील.
  4. घराच्या दर्शनी भागावर मंडळाचे बोधचिन्ह (LOGO) लावणे आवश्यक राहील.
  5. छतासाठी स्थानिक गरजे नुसार मजबुत लोखंडी किंवा सिमेंट पत्रे अथवा कौलांचा वापर करण्यास मुभा राहील.


महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ 👉अधिकृत संकेतस्थळ 


अटल बांधकाम कामगार आवास योजना 👉 अर्ज नमुना मिळवा

Post a Comment

Previous Post Next Post