बांधकाम कामगार योजना 2022 | अर्ज करा लाभ मिळवा

    नमस्कार मित्रांनो या लेखात आपण महाराष्ट्र शासनाची एक महत्वपूर्ण अशी योजना बांधकाम कामगार योजनेची माहिती पाहणार आहोत.  महाराष्ट्र शासन राज्यातील नागरिकांच्या उज्वल भविष्यासाठी विविध योजना सुरु करते त्या योजनांपैकीच एक योजना म्हणजे बांधकाम कामगार योजना (bandhkamkamgaryojana)

    बांधकाम कामगारांना रोजगार,त्यांची सामाजिक सुरक्षा, कामगारांच्या मुलांना शैक्षणिक सहाय्य्य, त्यांच्या आरोग्यविषयी सहाय्य्य,आर्थिक सहाय्य्य तसेच त्यांच्या कल्याणासाठी विविध उपाय योजना करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजनेची सुरुवात केली आहे.या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो तसेच त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देखील केली जाते.

बांधकाम कामगार योजना 2022


    कामगारांसाठी कामाची चांगली परिस्थिती उपलब्ध करणे तसेच त्यांचे जीवनमान सुधारणे ,धोकादायक क्षेत्रांमध्ये बालकामगारांना काम न करू देणे ,तसेच रोजगार क्षमता व रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी शाश्वत आधारावर कौशल्य विकास करणे.सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी कार्य, कामांची स्थिती, व्यावसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी धोरणे / कार्यक्रम / योजना / प्रकल्प घालून आणि कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा करणे, घातक व्यवसायापासून बाल श्रम काढून टाकणे आणि प्रक्रिया, श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकट करणे आणि कौशल्य विकास आणि रोजगार सेवांचा प्रचार करणे अशा अनेक बाबींचा या योजनेत सामाविष्ट्य करण्यात आल्या आहेत


    जर आपणास बांधकाम कामगार योजनेचा लाभ घ्यावयाचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा लागेल.या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत अत्यंत सोप्पी आहे.  ही माहिती शेवट पर्यंत वाचा आणि या योजनेचा लाभ मिळवा.


विशेष सूचना: जर तुमच्या आजूबाजूला असे कोणी बांधकाम कामगार असतील तर त्यांना सरकार च्या या बांधकाम कामगार योजनेबद्दल अवश्य सांगा जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील.


आपण महाराष्ट्र शासनाच्या विविध सरकारी योजना (Sarkari Yojana) आणि त्यांचे फायदे जाणून घेत असतो. पण आज आपण बांधकाम कामगार योजना काय आहे, Bandhkam Kamgar Yojana कोणासाठी आहे,बांधकाम कामगार योजना फायदे काय आहेत, बांधकाम कामगार योजना आवश्यक पात्रता व अटी काय आहेत, बांधकाम कामगार योजना फॉर्म, बांधकाम कामगार योजना संबंधीत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत तरी इच्छुक आणि पात्र लाभार्त्यांनी या योजनेच्या लाभ अवश्य घ्यावा.

                                          हे पण वाचा

                                            👇

50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान फक्त याच वर्षांतील शेतकऱ्यांनाच मिळणार


  • बांधकाम कामगार योजनेचे लाभार्थी ( bandhkam kamgar yojana beneficiary )
  • बांधकाम कामगार योजना 2022


    बांधकाम कामगार योजनेचा लाभ नवीन इमारत बांधण्यापासून ते ती इमारत पूर्ण होईपर्यंत जे मजूर त्यामध्ये काम करतात अश्या सर्व कामगारांना या योजनेअंतर्गत नोंदणी करून या योजनांचा लाभ घेता येतो.

कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी खालील प्रमाणे आहे

  1. इमारती,
  2. रस्त्यावर,
  3. रस्ते,
  4. रेल्वे,
  5. ट्रामवेज
  6. एअरफील्ड,
  7. सिंचन,
  8. ड्रेनेज,
  9. तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,
  10. स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,
  11. निर्मिती,
  12. पारेषण आणि पॉवर वितरण,
  13. पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
  14. तेल आणि गॅसची स्थापना,
  15. इलेक्ट्रिक लाईन्स,
  16. वायरलेस,
  17. रेडिओ,
  18. दूरदर्शन,
  19. दूरध्वनी,
  20. टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,
  21. डॅम
  22. नद्या,
  23. रक्षक,
  24. पाणीपुरवठा,
  25. टनेल,
  26. पुल,
  27. पदवीधर,
  28. जलविद्युत,
  29. पाइपलाइन,
  30. टावर्स,
  31. कूलिंग टॉवर्स,
  32. ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
  33. दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,
  34. लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
  35. रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
  36. गटार व नळजोडणीची कामे.,
  37. वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
  38. अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
  39. वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
  40. उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
  41. सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
  42. लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
  43. जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
  44. सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,
  45. काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,
  46. कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,
  47. सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
  48. स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
  49. सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
  50. जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
  51. माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,
  52. रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
  53. सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.

                    यात समाविष्ट होणाऱ्या सर्व कामगारांना या योजनेचा लाभ घेता येतो.

                                      हे पण वाचा

                                            👇

किसान क्रेडिट कार्ड योजना माहिती | Kisan Credit Card  | KCC


  • बांधकाम कामगार योजनेची उद्दीष्टे (bandhkam kamgar yojana maharashtra purpose)


महाराष्ट्र राज्यातील नोंदणी असलेल्या सर्व बांधकाम कामगारांच्या विशेष हिताच्या विविध योजना राबविणे हे बांधकाम कामगार योजनेचे मुख्य उद्दिष्ट्य आहे.


  1. नवीन बांधकाम कामगार ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुलभ करणे.
  2. बांधकाम कामगारांपर्यंत विविध योजनांची माहिती पोहोचणे आणि त्यांच्याकडून विविध माहिती गोळा करणे.
  3. योजनेच्या लाभासाठीचा अर्ज दाखल करण्याच्या पद्धतींत अधिक सुलभपणा आणणे.
  4. कल्याणकारी योजनांच्या लाभ देण्याच्या पद्धतींत सुटसुटीतपणा आणणे.
  5. योजनेच्या लाभाची रक्कम थेट बँक खात्यात जमा करणे.
  6. बांधकाम कामगार नोंदणी वाढविण्यासाठी त्यांच्या कामाच्या जागेवर जाऊन नोंदणी करणे.
  7. प्रत्येक बांधकाम कामगाराला नोंदणी क्रमांक देणे.
  8. योजनेअंतर्गत लाभार्थ्यास योजनेचा त्वरित लाभ देणे.
  9. कार्यकारी क्षमतेमध्ये कुशलता आणणे.
  10. नोंदणीच्या मान्यतेसाठी मान्यताप्राप्त अधिकाऱ्याकडून नोंदणीची ऑनलाइन प्रक्रिया.
  11. कल्याणकारी योजनांच्या व्यवस्थापनासाठी प्रगत विश्लेषण.

                                         हे पण वाचा

                                                👇

बांधकाम कामगार योजना 2022


  • बांधकाम कामगार योजना फायदे ( maharashtra bandhkam kamgar yojana benefits )


नोंदणीकृत बांधकाम कामगाराला खालीलप्रमाणे लाभ घेता येईल.


1. सामाजिक सुरक्षा:


  1. नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगाराच्या स्वत:च्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपुर्तीसाठी ३०,०००/- रूपये अनुदान दिले जाते. (विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक / प्रथम विवाह असल्याचे शपथपत्र)
  2. नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास मोफत मध्यान्ह भोजन सुविधा दिली जाते.
  3. नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत लाभ दिला जातो. (पाल्याचे शाळेचे ओळखपत्र आवश्यक)
  4. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी उपयुक्त/आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरीता प्रतीकुटूंब ५,०००/- रुपये अर्थसहाय्य दिले जाते. (अवजारे खरेदी करणार असल्याचे कामगारांचे हमीपत्र)
  5. नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत विविध लाभ दिले जातात
  6. नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम कामगारास प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत विविध लाभ दिले जातात.
  7. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पात्र कामगारास पूर्व शिक्षण आणि ओळख प्रशिक्षण दिले जाते
  8. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत पात्र कामगारांना मोफत सुरक्षा संच पुरविले जातात.
  9. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारास अत्यावश्यक संच पुरविले जातात.
  10. दिनांक ३१ ऑगस्ट २०१४ रोजी नोंदणी जिवीत असलेल्या सवर् नोंदीत बांधकाम कामगाराना दैनंदिन गरजेच्या वस्तु खरेदीसाठी प्रति कामगार ३०.०००/- रुपये अर्थसहाय्य दिले जाईल.



2.शैक्षणिक सहाय्य्य:


  1. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता १ली ते ७वी मध्ये किमान ७५ टक्के किंवा अधिक गुण असल्यास २५००/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते. (७५ टक्के हजेरीबाबतचा शाळेचा दाखला)
  2. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता ८वी ते १०वी मध्ये किमान ७५ टक्के किंवा अधिक गुण असल्यास प्रतिवर्षी ५०००/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक आर्थिक सहाय्य दिले जाते. (७५ टक्के हजेरीबाबतचा शाळेचा दाखला)
  3. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता १०वी व इयत्ता १२वी मध्ये किमान ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास १०,०००/- रुपये प्रोत्साहनात्मक शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (किमान ५० टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्याची गुणपत्रिका)
  4. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना इयत्ता ११वी व इयत्ता १२वी च्या शिक्षणासाठी प्रती शैक्षणिक वर्षी १०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (इयत्ता १०वी व १२वी ची गुणपत्रिका)
  5. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी २०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती / बोनाफाईड)
  6. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना अथवा पुरुष कामगाराच्या पत्नीस वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यासाठी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदी इत्यादीसाठी प्रती शैक्षणिक वर्षी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरीता १ लाख रुपये व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरीता ६०,०००/- रुपये शैक्षणिक सहाय्य दिले जाते. (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती / बोनाफाईड)
  7. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना शासनमान्य पदविकेमध्ये शिक्षण घेत असलेल्या पाल्यास प्रती शैक्षणिक वर्षी २००००/- रुपये आणि पदव्युतर पदवीका मध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रती शैक्षणिक वर्षी २५,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (मागील शैक्षणिक इयत्तेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / गुणपत्रक आणि चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतल्याची पावती / बोनाफाईड)
  8. संगणकाचे शिक्षण (MS-CIT) घेत असलेल्या नोंदणीकृत लाभार्थी कामगारांच्या २ पाल्यांना, शुल्काची परीपुर्ती, तथापि MS-CIT उतीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर केल्यास सदर शुल्काची प्रतिपुर्तीसाठी करण्यात येते. ( MSCIT उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र / शुल्क पावती)
  9. नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप करण्यात येईल.



3. आरोग्यविषयक सहाय्य्य:


  1. नोंदणी केलेल्या स्त्री लाभार्थी बांधकाम कामगारांस तसेच नोंदणी केलेल्या पुरुष लाभार्थी बांधकाम कामगारांच्या पत्नीस २ जिवीत अपत्यांपर्यंत नैसर्गिक प्रसुतीसाठी १५,०००/- रुपये व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी २०,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले नैसर्गिक / शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीचे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचाराची देयके)
  2. लाभार्थी कामगार व त्यांच्या कुटूंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ १ लाख रुपये वैद्यकिय सहाय्य (एका सदस्यास केवळ एकदाच आणि कुटूंबातील दोन सदस्यांपर्यंत मर्यादित) तसेच आरोग्य विमा योजना लागू नसल्यासच सदर योजनेचा लाभ दिला जातो. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर आजार असल्याबाबत दिलेले प्रमाणपत्र आणि वैद्यकीय उपचार विषयक कागदपत्रे)
  3. कामगाराने पहिल्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावे १८ वर्षापर्यंत प्रत्येकी १ लाख रुपये मुदत बंद ठेव चा लाभ दिला जाईल. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले कुटुंबनियोजन शास्त्रक्रियेबाबतचे प्रमाणपत्र आणि अर्जदारास एक कन्या अपत्यापेक्षा जास्त अपत्य नसल्याचा पुरावा शपथपत्र)
  4. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारांस ७५ टक्के किंवा कायमचे अपंगत्व आल्यास त्यास २ लाख रुपये आर्थिक सहाय्य तसेच नोंदीत बांधकाम कामगाराचे विमा संरक्षण असल्यास, विमा रक्कमेची प्रतिपूर्ती अथवा मंडळामार्फत २ लाख रुपये आर्थिक सहाय्य यापैकी कोणताही एक लाभ दिला जाईल. (७५ टक्के अपंगत्व असल्याचे सक्षम वैद्यकीय अधिकारी / मंडळाचे प्रमाणपत्र व वैद्यकीय उपचाराची देयके)
  5. नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेता येईल.
  6. नोंदणीकृत कामगारांची वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. (शासकीय / निमशासकीय व्यसनमुक्ती केंद्रातून उपचार घेतल्याचे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र)



4. आर्थिक सहाय्य्य:


  1. नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगाराचा कामावर असताना मृत्यु झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला / बांधकाम कामगार kamavar असताना मृत्यू झाल्याबाबतचा पुरावा)
  2. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याचं कायदेशीर वारसास २ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य्य दिले जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकऱ्यानी दिलेला मृत्यू दाखला)
  3. नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगारास अटल बांधकाम कामगार आवास शहरी अर्थसहाय्य्य योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते. (प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र)
  4. नोंदणी केलेल्या लाभार्थी बांधकाम कामगारास अटल बांधकाम कामगार आवास ग्रामीण अर्थसहाय्य्य योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य्य केले जाते. (प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र)
  5. घर बांधणी साठी ४.५ लाख रुपये अर्थसहाय्य (केंद्र शासन २ लाख रुपये व कल्याणकारी मंडळ २.५ लाख रुपये) दिले जाईल.
  6. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या नामनिर्देशित केलेल्या वारसास १०.०००/- रुपये त्याच्या अंत्यविधीसाठी मदत स्वरूपात दिली जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला)
  7. नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगाराचा मृत्यु झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराचे विधुर पतीस फक्त ५ वर्षांपर्यंत प्रतिवर्षी २४,०००/- रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते. (सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेला मृत्यू दाखला)
  8. घरखरेदी किंवा घरबांधणीकरिता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची रक्कम 6 लाख किंवा 2 लाख अनुदान स्वरूपात दिली जाईल. (राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा / कर्ज विम्याची पावती / घर पती पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणीकृत असल्याचा पुरावा)
  9. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांकरीता व्यसनमुक्ती केंद्रापर्यंत उपचाराकरीता नोंदीत बांधकाम कामगारास रु६,०००/- रुपये अर्थसहाय्य दिले जातील.

                           हे पण वाचा

                                👇

कर्मचाऱ्यांच्या किमान पगार मर्यादेत वाढ होऊ शकते


  • महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना अटी ( bandhkam kamgar yojana terms & condition )


  1. १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  2. अर्जदार महाराष्ट राज्याचा नागरिक असणे आवश्यक आहे.
  3. मागील १२ महिन्यामध्ये ९० दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असणे आवश्यक.
  4. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे.
  5. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाखाच्या आत असणे आवश्यक
  6.  या योजने अंतर्गत सर्व लाभ फक्त नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांसाठी लागू आहेत.


  • बांधकाम कामगार योजना नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे  ( bandhkam kamgar yojana require documents )


  1. नोंदणी अर्ज
  2. पासपोर्ट आकारातील 3 फोटो
  3. अर्जदाराचा जन्म प्रमाणपत्र (जन्माचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला)
  4. नियोक्त्याचे मागील वर्षभरात ९० दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याच्या दाखला (इंजिनिअर/ठेकेदार)
  5. महानगर पालिकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  6. स्थानिक पत्ता पुरावा
  7. कायमचा पत्ता पुरावा
  8. पॅन कार्ड
  9. दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशनकार्ड
  10. अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड
  11. अन्नपूणा शिधापत्रिका
  12. केशरी शिधापत्रिका
  13. काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
  14. उत्पन्नाचा दाखला
  15. आधार कार्ड
  16. मतदान ओळखपत्र
  17. रहिवाशी पुरावा
  18. बँक पासबुक झेरॉक्स
  19. ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
  20. नोंदणी फी- रू. 25/- व वार्षिक वर्गणी रू.60/- (5 वर्षाकरिता) व मासिक वर्गणी रु.1/-

👉अर्ज डाउनलोड


बांधकाम कामगार नोंदणी फॉर्म (संदर्भा साठी) 👉अर्ज डाउनलोड

बांधकाम कामगार नूतनीकरण फॉर्म (संदर्भा साठी) 👉अर्ज  डाउनलोड

ग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (संदर्भा साठी) 👉अर्ज डाउनलोड

बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात ९० किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र (संदर्भा साठी) 👉अर्ज डाउनलोड

ऑनलाइन नोंदणीसाठी: आधार संमती फॉर्म (संदर्भा साठी) 👉अर्ज डाउनलोड

ऑनलाइन नोंदणीसाठी: स्वयंघोषणापत्र (संदर्भा साठी) 👉अर्ज डाउनलोड

हे पण वाचा

👇

5Hp सोलर पंप 3 लाख 25 हजार रुपये नविन GR आला.

सामाजिक सुरक्षा योजना अर्जाचे फॉर्म


नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु.३०,०००/-.  👉अर्ज डाउनलोड

व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप. 👉अर्ज डाउनलोड

नोंदीत बांधकाम कामगारास हत्यारे /अवजारे खरेदी करण्याकरिता रू.५०००/-. अर्थसहाय्य 👉अर्ज डाउनलोड

नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना. 👉अर्ज डाउनलोड

नोंदीत बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. 👉अर्ज डाउनलोड

नोंदीत बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धीकरण योजना. 👉अर्ज डाउनलोड



शैक्षणिक योजना अर्जाचे फॉर्म


नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी रू.२५००/- किंवा इ.८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी रू.५०००/-. 👉अर्ज डाउनलोड

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५०% किंवा अधिक गुण मिळाल्यास रू.१०,०००/-. 👉अर्ज डाउनलोड

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता ११ वी व १२ वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रू.१०,०००/-. 👉अर्ज डाउनलोड

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवी च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रू. २०,०००/-. 👉अर्ज डाउनलोड

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रू.१,००,०००/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रू.६०,०००/- 👉अर्ज डाउनलोड

नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी रू.२०,०००/- व पदव्युत्तर पदविकेकरिता रू.२५,०००/- 👉अर्ज डाउनलोड

नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती. 👉अर्ज डाउनलोड


आरोग्य विषयक योजना अर्जाचे फॉर्म


नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,०००/- व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु. २०,०००/- 👉अर्ज डाउनलोड

नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ रू.१,००,०००/- (आरोग्यविमा योजना लागू नसल्यासच) 👉अर्ज डाउनलोड

पती/पत्नीने पहिला मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत १८ वर्षापर्यंत रू.१,००,००० मुदत बंद ठेव 👉अर्ज डाउनलोड

नोंदीत बांधकाम कामगारास ७५% अपंगत्व आल्यास रू.२,००,०००/- अर्थसहाय्य 👉अर्ज डाउनलोड

नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना 👉अर्ज डाउनलोड


अर्थसहाय्य योजना अर्जाचे फॉर्म


नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू  झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रू.५,००,०००/- 👉अर्ज डाउनलोड

नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रू.२,००,०००/- 👉अर्ज डाउनलोड

नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरखरेदी किंवा घरबांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रू.६ लक्ष पर्यतच्या व्याजाची रक्कम अथवा रू.२ लक्ष अनुदान. 👉अर्ज डाउनलोड

नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करिता रू. १०,०००/- 👉अर्ज डाउनलोड

नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रू.२४,०००/- (५ वर्षांकरिता) ,(प्रति वर्षी अर्ज करणे आवश्क्य राहील). 👉अर्ज डाउनलोड

धन्यवाद.

  • नवीन माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल अवश्य करा.

              👇

                     संकल्प मराठी




  • युट्युब चॅनेल लिंक 

          👇

      संकल्प मराठी यूट्यूब चॅनल



Post a Comment

Previous Post Next Post