किसान क्रेडिट कार्ड योजना माहिती | Kisan Credit Card | KCC

   चला तर वाचकांनो आज आपण जाणून घेऊयात किसान क्रेडिट कार्ड याविषयी. शेतकऱ्यांना सावकरांच्या तडाखा पासून मुक्ती मिळून त्यांना शेतीच्या कामाला स्वस्त दरामध्ये लोन देण्यासाठी क्रेडिट कार्ड (kisan credit card) एक चांगली योजना आहे. या योजनेत शेतकर्यांना 3 लाखांपर्यंत लोन दिले जाते. बजेट २०२२ मध्ये आशा आहे की सरकार लोनची ही लिमिट वाढवू शकते. केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आर्थिक सहाय्य करण्यासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत किसान क्रेडिट कार्ड तयार केले जात आहे. ज्या शेतकर्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत लाभ मिळत आहे ते शेतकरी आपल्या जवळच्या बँकेत जाऊन सहजपणे या सुविधेचा फायदा घेऊ शकता. 

किसान क्रेडिट कार्ड


किसान क्रेडिट कार्ड माहिती

वैधता (Validity)                        :- ५ वर्ष

लिमिट (Limit) :- ३ लाख

कागदपत्रे (Document)               :- आधारकार्ड, सातबारा दाखला, बँक खाते माहिती, मोबाईल नंबर

व्याजदर (Interest)                      :- ७%

वार्षिक शुल्क (Annual Charges) :- १५० रुपये

वय मर्यादा (Age Limit) :-१८ ते ७५ वर्षे



किसान क्रेडिट कार्ड यादी – Kisan Credit Card List

पीएम किसान योजनेची नोंद पाहण्यासठी सर्वात आधी आपल्याला प्रथम पोर्टलवर गेले पाहिजे. https://pmkisan.gov.in आता आपण फार्मर कोर्नेर (Farmers Corner) वर जा. येथे खूप पर्याय आपल्याला दिसतील.



वरती दिलेल्या इमेज प्रमाणे आंपण बेनिफीसरी लिस्टवर क्लिक करा.



बेनिफीसरी लिस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला वरती दिलेल्या विंडो प्रमाणे आपल्याला एक विंडो देसेल यानंतर आपल्याला प्रथम पहिल्या बॉक्स मध्ये आपल्या स्टेट निवडावा (उदा. महाराष्ट्र). त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बॉक्स मध्ये आपला जिल्हा निवडावा (उदा. पुणे). यानंतर आपल्याला तिसऱ्या बॉक्स मध्ये आपला तालुका निवडावा (उदा. पुरंदर). यानंतर आपल्याला चौथ्या बॉक्स मध्ये आपला ब्लॉक निवडावा (उदा. पुरंदर). यानंतर आपल्याला शेवटच्या बॉक्स मध्ये आपला गाव निवडावा (उदा. सासवड रुरल). यानंतर आपल्याला खालीलप्रमाणे लिस्ट दिसेल. यामध्ये आपआपले नाव आपण शोधावेत.



  •  किसान क्रेडिट कार्ड काढताना लागणारी आवश्यक कागदपत्रे – Documents required for Kisan Credit Card

आपल्याला नवीन किसान क्रेडिट कार्ड काढताना लागणारी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे:

आधारकार्ड, पैन कार्ड, वोटर आयडी, ड्रायविंग लायसेन्स, पासपोर्ट यामधील कोणताही एक

सातबारा दाखला

बँक अकाउंट माहिती

मोबाईल नंबर

वरील कागदपत्रे आपल्याला किसान क्रेडिट कार्ड काढताना लागणार आहेत.



 

  • क्रेडिट कार्ड कसे काढावे – How to get a kisan credit card

चला आज आपण जाणून घेऊयात आपण कसे आपल्या बँक मधून किसान क्रेडीट कार्ड कसे ऑनलाइन आवेदन करू शकतो. यासाठी आपल्याला Registration Form भरायला पाहिजेत आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजेत. तुमच्या जवळील CSC Center ( Common Service Center ) मध्ये किसान क्रेडीट कार्ड अर्ज भरून मिळेल. 

    शेतकर्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत लाभ (हप्ते ) ज्या बँकेत मिळतात त्या बँकेचे किसान क्रेडिट कार्ड मिळते.

सर्व बँक ऑनलाइन आवेदन स्वीकारत नाहीत फक्त काही बँका ऑनलाइन आवेदन स्वीकारतात. तसेच आपल्याला बँकच्या वेबसाईट वर ऑनलाइन आवेदन व रजिस्ट्रेशन लिंक नाही मिळाली तर आपण ऑफलाइन रजिस्ट्रेशन फॉर्म डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून सर्व माहिती भरून त्यानंतर बँक मध्ये जमा करा. मी  खाली आपल्याला बँकच्या ऑफलाइन रजिस्ट्रेशन फॉर्मची ऑफिसियल लिंक दिलेली आहे, यावर क्लिक करून आपण रजिस्ट्रेशन फॉर्म डाउनलोड करू शकता. kisan credit card pdf in marathi खाली दिलेली आहे.


  • किसान क्रेडीट कार्डचे फायदे

या योजनेद्वारे लाभार्थी सरकारद्वारे 3 लाख रुपयापर्यंत खूप कमी दरांवर कर्ज मिळू शकतो.

शेतकऱ्यां सोबत मासे पाळणारे आणि जनावरांचे पालन करनाऱ्या लोकांनाही या योजनेत समावेश केलेला आहे.

आपण ही योजना ऑनलाइन / ऑफलाइन दोन्ही मार्गांवर अर्ज केले जाऊ शकतात.

जसे की या स्कीममध्ये 3 लाखांपर्यंत कर्ज मिळते. जर व्याज दराबद्दल सांगायचे असेल तर ते फक्त ७% आहे, जेव्हा कर्ज देण्यापूर्वी तिची रक्कम कमी करायची असेल तर त्या दरात ३% जास्त सूट असेल तर त्या कालावधीत परत येण्याची वेळ येईल. फक्त 4% व्याज दर एवढे पैसे परत करायचे.

शेतक्यांना एटीएम सह क्रेडिट कार्ड मिळते जे एटीएममधून पैसे काढण्यासाठी वापरले जाऊ शकते.

केसीसी 12 महिन्यांच्या परतफेड कालावधीसह येतो, जे कर्ज फेडण्यासाठी पुरेसा वेळ देते.

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लोन घेणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं, तर त्याला 50 हजार रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं, तसंच इतर धोक्यांसाठी 25 हजार रुपयांचं विमा संरक्षण दिलं जातं.



  • किसान क्रेडीट कार्डचे तोटे

किसान क्रेडिट कार्डची वैधता कालावधी 5 वर्षे आहे.

किसान क्रेडिट कार्डचे वार्षिक शुल्क १५० रुपये आहे.

किसान क्रेडिट कार्डचे वय मर्यादा १८ ते ७५ वर्ष एवढी आहे.

किसान क्रेडिट कार्ड वरून जे काही कर्ज दिलं जातं त्यावर 7 टक्के व्याजदर आकारला जातो. पण, शेतकरी कर्जाची परतफेड वर्षभरात करणार असेल, तर व्याजदरात 3 टक्के सवलत दिली जाते. नाहीतर त्यावर 7 टक्के व्याजदर आकारला जातो.


किसान क्रेडिट कार्डचे अर्जासाठी 👉 अर्ज



धन्यवाद.

  • नवीन माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

        👇

संकल्प मराठी

  • युट्युब चॅनेल

        👇

संकल्प मराठी यूट्यूब चॅनल


Post a Comment

Previous Post Next Post