ई-श्रम कार्ड योजना २०२२ | E-Shram Card

    नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण भारत सरकार ने सुरु केलेल्या ई-श्रम कार्ड या योजेनेबाद्द्ल माहिती पाहणार आहोत. भारत सरकारने ऑगस्ट २०२१ मध्ये देशात ई-श्रम कार्ड या योजनेची सुरुवात केली. या योजनेची सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत यात मुख्यतः आपण ई-श्रम कार्ड योजना, लाभार्पाथी पात्रता, फोर्म कसा भरावा, योजेनेचे लाभ ई. या घटकांची माहिती पाहणार आहोत. तुम्ही घर बसल्या ई-श्रम कार्ड मिळवू शकता त्यासाठी हा लेख वाचा.

ई-श्रम कार्ड योजना २०२२ | E-Shram Card

    ई-श्रम कार्ड योजना

    ई-श्रम कार्ड या योजने अतर्गत आत्ता पर्यंत २.७ कोटी नागरिकांनी नोंदणी करून ई-श्रम कार्ड बनवून घेतले आहेत. देशातील असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी ई-श्रम कार्ड पोर्टल वर नोंदणी सुरु केली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालय मार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाते. ई-श्रम कार्ड योजना हि देशातील १६ वर्ष वयोगटापासून ५८ वर्ष वयोगटातील नागरिकांसाठी उपयोगी योजना आहे. 
    ई-श्रम पोर्टल हे मुख्यता असंघटीत क्षेत्रातील कामगारांची माहिती संघटीत करण्यासाठी सुरु केले आहे. या पोर्टल मार्फत असंघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंदणी केली जाते. यासाठी भारत सरकार ने ४०४ कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे.   ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यात कामगारास बारा अंकी क्रमांक दिला जातो.

हे पण वाचा
👇

    ई-श्रम कार्ड योजना उद्दिष्ट

   या योजेनेचे मुख्य उद्दिष्ट हे सर्व असंघटीत क्षेत्रातील कामगारांची माहिती राष्ट्रीय स्थरावर गोळा करून अश्या असंघटीत कामगारांना सामाजिक सुरक्षा योजनांची अंमलबजावणी करून सुरक्षा प्रदान करणे तसेच याद्वारे कामगारांच्या कौशल्यानुसार त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हे आहे.

    ई-श्रम कार्ड योजना फायदे  

  • ई-श्रम कार्ड योजनेसाठी नोंदणी केलेल्या कामगारांना भारत सरकार मार्फत विमा संरक्षण दिले जाईल.
  • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारास अपघातामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्या लाभार्थ्यास २ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल.
  • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारास अपघातामध्ये मृत्यू जाल्यास त्या लाभार्थ्याच्या कुटुंबियांस २ लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाईल.
  • नोंदणी केलेल्या लाभार्थी कामगारास अपघातामध्ये आंशिक अपंगत्व आल्यास १ लाख रुपये देण्याची तरतूद निश्चित करण्यात आली आहे.


हे पण वाचा
👇

      ई-श्रम कार्ड योजना लाभार्थी कोण

शेतमजूर
लहान आणि अल्पभूधारक शेतकरी
CSC केंद्र चालक
आशा कार्यकर्त्या
भाजीपाला व फळ विक्रेता
मनरेगा कामगार ( महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत काम करणारे)
वृतपत्र विक्रेता
न्हावी
घरघुती कामगार
सुतार
लेदर कामगार
इमारत व बांधकाम कामगार
सुईनी
लेबलिंग कामगार
कोळी 
सफाई कामगार ई.
    
    या क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार या योजेनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील.
    टीप :- ज्या कामगारांचा समावेश EPFO आणि ESIC मध्ये होतो त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

    ई-श्रम पोर्टल महत्वाच्या लिंक

ई-श्रम पोर्टल (अधिकृत संकेतस्थळ)      👉  लिंक
ई-श्रम कार्ड नोंदणी।                             👉लिंक
ई-श्रम कार्ड CSC Center Location शोध लिंक 👉लिंक

हे पण वाचा
👇
    

    ई-श्रम योजेनेसाठी नोंदणी करिता आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड क्रमांक
मोबाईल नंबर 
पत्याचा पुरावा ( आधार कार्ड )
वयाचा पुरावा ( आधार कार्ड )
उत्पनाचा दाखला
राष्ट्रीयकृत बँकेचा बचत खाते क्रमांक पासबुक 
बँक पासबुक वरील IFSC कोड
रेशन कार्ड


 ई-श्रम योजेनेसाठी नोंदणी कशी करावी.

    ई-श्रम योजेनेची नोंदणी हि ONLINE प्रणालीद्वारे करावी लागते. ई-श्रम च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याची नोंदणी करावी लागते. हि नोंदणी दोन प्रकारे करता येते.

१. आपण स्वतः
२. CSC केंद्रामध्ये

    आपण स्वतः घरी बसल्या नोंदणी करू शकतो परंतु त्यासाठी आपल्या कडील आधार कार्ड ला आपला चालू मोबाईल क्रमांक संलग्न असणे आवश्यक आहे आणि तसे नसल्यास आपण आपल्या जवळील CSC केंद्रामधूनहि या योजेनेसाठी नोंदणी करू शकतो. आपण आपल्या पुढील लेखात नोंदणी कशी करतात या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.


हे पण वाचा 
👇



ई-श्रम योजनेसाठी संपर्क
आम्ही या लेखाद्वारे तुम्हाल ई-श्रम योजनेबद्दल सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याबद्दल कोणत्याहि प्रकारची समस्या येत असेल, तर तुम्ही ई-श्रम हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून तसेच ईमेल लिहून आपल्या समस्येचे निवारण करू शकता.
हेल्पलाईन क्रमांक : - १४४३४
ईमेल आयडी         :-eshram-care@gov.in
पत्ता                       :- कामगार आणि रोजगार मंत्रालय, भारत                                         सरकार, जैसलमेर हाउस, मानसिंग रोड, नवी                                   दिल्ली - ११०००१
फोन नंबर               :- ०११-२३३९८९९२८


धन्यवाद, माहिती आवडल्यास नक्की share करा..




  • नवीन माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल अवश्य करा.

                                   👇

                            संकल्प मराठी

  • युट्युब चॅनेल लिंक 

               👇

      संकल्प मराठी यूट्यूब चॅनल











Post a Comment

Previous Post Next Post