छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे जुन्नर येथे अनावरण

 जुन्नर :-  २२ एप्रिल-शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आज अनावरण केले.ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला असा हा जुन्नर तालुका आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्म ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण


      कार्यक्रमाला आमदार अतुल बेनके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे, पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर, माजी आमदार बाळासाहेब दांगट, जुन्नरचे माजी नगराध्यक्ष शाम पांडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, आशाताई बुचके, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आदी उपस्थित होते. 

     शिवनेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पंचलीग चौकात जुन्नर नगरपालिकेच्या वतीने २००१ मध्ये अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा नवीन अश्वारुढ पुतळा उभारण्यात यावा अशी शिवभक्तांची गेली अनेक वर्षापासूनची मागणी होती. त्यानुसार जुना पुतळा हलवून येथे नवीन पुतळा उभारण्यात आला. पुणे येथील खेडकर स्टुडिओ मध्ये कलाकार निलेश खेडकर हा पुतळा तयार केला असून या पुतळ्याची २८ लाख रुपये किंमत असून खालील चबुतरा बनविण्यासाठी २५ लाख रुपये खर्च येणार आहे. पुतळ्यासाठी राज्य सरकारकडून सर्व शासकीय परवानग्या मिळाल्या आहेत.या पुतळ्याचे पावित्र्य जपण्याची,देखभाल व दुरुस्तीची संपूर्ण जबाबदारी जुन्नर नगर पालिकेची राहणार असल्याचे हमीपत्र जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे. जुना पुतळा पिंपळवंडी ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार त्यांना विनामोबदला सुपूर्द केला आहे.


धन्यवाद


नवीन माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा


        👇


संकल्प मराठी




युट्युब चॅनेल


        👇


संकल्प मराठी यूट्यूब चॅनल


Post a Comment

Previous Post Next Post