नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान.

महाविकास आघाडी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात नियमीत कर्ज भरणाऱ्यांना ५० हजार अनुदान देण्याची तरतुद केली आहे. या आर्थिक वर्षात ते अनुदान आम्ही देणार आहोत, अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
 
महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयासंदर्भात ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकार सत्तवेर आल्यावर महात्मा जोतीबा फुले कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. पिकांसाठी अल्पमुदतीचे ज्यांनी कर्ज घेतले आहे. त्यांना दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरले आहेत, त्यांना ५० हजार रुपये देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती.
मात्र, गेली दोन वर्षे दुर्दैवाने कोरोना आला. त्यामुळे महसुलात अपेक्षीत वाढ झाली नाही. त्यामुळे विकास कामांवर परिणाम झाला. त्यामुळे ते ५० हजार अनुदान देणे शक्य झाले नाही. मात्र, उपमुख्यमंत्री पवार यांनी यंदाचा अर्थसंकल्प मांडताना त्यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात त्याची तरतुद केली असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांनी या आर्थिक वर्षात ते अनुदान आम्ही अनुदान देय आहोत, असेही नमुद केले आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात ते अनुदान आम्ही देणार आहोत.karj anudan

हे पण वाचा
👇

50 हजार अनुदान 

50 हजार अनुदान हे नियमित कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 
दिले जाणार आहे. परंतु पुढील वर्षातच कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान दिले जाईल.

2017-18  :-  50,000/-
2018-19 :-  50,000/-
2019-20 :-  50,000/-




नवीन माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
              👇



    युट्युब चॅनेल
            👇





Post a Comment

Previous Post Next Post