UIDAI ने लॉन्च केले नवीन आधार कार्ड, अधिक जाणून घ्या आणि तुम्हाला ते कसे मिळेल?

Aadhaar PVC Card: आधार कार्ड (Aadhar Card) हे एक अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे, ज्याशिवाय आता देशात कोणतेही काम होत नाही. भारतातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. हा पत्ता पुरावा जन्माचा पुरावा म्हणून देखील वैध आहे. बँकेच्या कामापासून पोस्ट ऑफिस आणि पासपोर्टपर्यंत आधार कार्ड असणे आवश्यक आहे. आधार जारी करणारी संस्था UIDAI वेळोवेळी आधार कार्डशी संबंधित माहिती शेअर करत असते. आता UIDAIने एक नवीन सुविधा सुरु केली आहे.



UIDAI ने अलीकडे PVC(adhar card) कार्डवर आधार तपशील प्रिंट करण्यासाठी ‘आधार पीव्हीसी कार्ड’ (pvc adhar card) लाँच केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे खास सुरु करण्यात आले आहे.

पीव्हीसी म्हणजे काय?



UIDAI ने माहिती देताना सांगितले की, ‘आधार PVC कार्ड ऑर्डर करा’ ही UIDAI ने सुरू केलेली एक नवीन सेवा आहे, जी आधार धारकाला नाममात्र शुल्क भरुन PVC कार्डवर त्याचा/तिचा आधार तपशील छापण्याची सुविधा प्रदान करते. ज्या रहिवाशांकडे नोंदणीकृत मोबाइल क्रमांक नाही ते नोंदणीकृत, पर्यायी मोबाइल क्रमांक वापरुन ऑर्डर देऊ शकतात.

आधार कार्ड (Aadhar Card) हे आपल्या आयुष्यातील महत्वाचं ओळखपत्र आहे. अगदी सिम कार्ड घेण्यापासून ते घर घेण्यापर्यंत आधार कार्डची गरज भासते. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड लागतचं. आधार कार्डची ओळख झाल्यापासून त्यात अनेक बदल झाले आहेत. युनिक आयडेटिंफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने (Unique Identification Authority of India) यावर्षी PVC आधारकार्ड आणलंय. हे आधारकार्ड वापरायला अगदी सोपं असून ते जास्त टिकाऊ आहे.

आतापर्यंत आपलं आधारकार्ड प्रिंट स्वरुपात असायचं. मात्र आता UIDIA ने आधार कार्डच्या डिजीटल रुपाला मंजुरी दिली आहे. याचाच अर्थ हे आधारकार्ड तुम्ही फोनमध्ये डाऊनलोड करून सेव्ह करू शकता. जेव्हा तुम्हाला गरज भासेल तेव्हा तुम्ही डाऊनलोड केलेली कॉपी वापरू शकता. या आधारकार्डची सर्वात चांगली बाब म्हणजे तुम्ही एकच मोबाईल नंबर वापरून घरातील सर्वांचे PVC आधार कार्ड बनवून घेऊ शकता. याचा आकार अगदी छोटा असून एटीएम प्रमाणे तुम्ही तुमच्या खिशात ते ठेवू शकता. जसं हे वापरायला सोपं आहे, त्याचप्रमाणे ते बनवून घेण्यासाठी तुम्हाला अगदी कमी पैसे खर्च करावे लागतील.




नवीन माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल जॉईन करा

                      👇

संकल्प मराठी




युट्युब चॅनेल

👇

संकल्प मराठी यूट्यूब चॅनल




Post a Comment

Previous Post Next Post