50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान फक्त ह्याच वर्षांतील शेतकऱ्यांनाच मिळणार

     नमस्कार मित्रांनो मागील लेखात आपण पाहिलं होत कि नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान मिळणार आहे. या लेखात आपण ५० हजार रुपयाचे अनुदान कोण - कोणत्या वर्षी नियमित कर्जफेड केलेल्या शेतकर्यांना मिळणार आहे. महात्मा फुले कर्जमाफीअंतर्गत शेती कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. पण, कर्जमाफीवेळी नियमित कर्जदार असलेल्यांना नव्हे तर २०१७-१८ पासून २०२० पर्यंत थकबाकीत नसलेल्यांनाच लाभ मिळेल, असे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने पाठविलेल्या प्रस्तावावरून स्पष्ट होते. त्यानुसार जिल्हा बॅंकेचे ३५ हजार ८७९ तर राष्ट्रीयीकृत बॅंकांचे जवळपास 19 हजार शेतकरी पात्र ठरतील.

50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान 'या' वर्षांतील शेतकऱ्यांनाच मिळणार


किसान क्रेडिट कार्ड योजना माहिती | Kisan Credit Card  | KCC

    जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून किंवा राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून घेतलेल्या कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून व्याजमाफी दिली जाते. आता तीन लाखांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना शून्य टक्‍के व्याजाने वितरीत केले जात आहे. दरम्यान, सव्वादोन वर्षांपूर्वी जाहीर केलेली कर्जमाफी अजूनही संपूर्ण शेतकऱ्यांना मिळालेली नाही. अधिवेशनात विरोधी पक्षांकडून विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देताना स्पष्ट केले की, दोन वर्षांत दोन लाखांवरील कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर अनुदानाचा विषय मार्गी लावला जाईल. पहिल्यांदा ५० हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान नियमित कर्जदारांना मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्यानुसार २०१७-१८, २०१८-19 आणि २०१९-20 या तीन वर्षांत कर्जाची नियमित परत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांनाच प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल, असे चित्र आहे. जिल्हा बॅंकेने २०१७-१८ पासून २०१९-20 या तीन वर्षातील नियमित कर्जदारांची माहिती देताना शेवटच्या रकान्यात त्या तीन वर्षांत किती शेतकरी नियमित कर्जदार राहिले, याची माहिती दिली आहे. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने त्यांच्याकडील ३५ हजार ८७९ शेतकऱ्यांची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास सादर झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या जिल्ह्यातील ५५ शाखांमधील जवळपास 19 हजार शेतकऱ्यांचीही यादी पाठविण्यात आली आहे.

नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान.

  • उपमुख्यमंत्र्यांची समिती करणार अभ्यास

कर्जमाफीच्या लाभासंदर्भात अभ्यास करण्यासाठी यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली काही मंत्र्यांची उपसमिती स्थापन केली आहे. दोन लाखांवरील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी देता येईल. तत्पूर्वी, नियमित कर्जदारांना 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान देताना कोणत्या वर्षांतील आणि कोणत्या शेतकऱ्यांना तो लाभ द्यायचा, याचाही अभ्यास ही समिती करणार आहे. कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत थकबाकीत नसलेल्या नियमित कर्जदारांनाच हा लाभ मिळू शकतो, असे बोलले जात आहे.


प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 11 वा हफ्ता यादिवशी जमा होणार पण या यादीत नाव असेल तरच



धन्यवाद.

  • नवीन माहितीसाठी टेलिग्राम चॅनेल अवश्य करा.

                                   👇

                            संकल्प मराठी

  • युट्युब चॅनेल लिंक 

               👇

      संकल्प मराठी यूट्यूब चॅनल


Post a Comment

Previous Post Next Post