पि एम किसान योजना 21 हजार कोटी रुपये होणार शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग, या दिवशी बॅलन्स चेक करा | PM KISAN 11th INSTALLMENT

     पंतप्रधान किसान सन्मान निधी अर्थात पीएम किसान योजनेचा (PM KISAN) 2 हजार रुपयांचा दहावा हप्ता जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला.सुमारे दहा कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 20 हजार 900 कोटी रुपये वर्ग करण्यात येणार आहेत. दरम्यान मोदी सरकारने पीएम किसान योजनेत (pm modi) एक बदल केला आहे. 1 जून रोजी किसान सन्मान निधीचे पैसे मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


Pm kisan


आतापर्यंत शेतकरी रजिस्ट्रेशननंतर आपले स्टेट्स स्वत: चेक करु शकत होते. अर्जाची स्थिती काय आहे, पैसे आले की नाही हे शेतकऱ्यांना पाहता येत होते. आतापर्यंत शेतकरी पीएम किसान पोर्टलवर जाऊन आपला आधार नंबर, मोबाइल अथवा अकाउंट नंबर टाकून पैसे जमा झालेत की नाही याची खात्री करत होते. पण, आता हा नियम लागू होणार नाही.pm kisan 11th installment  

हे पण वाचा

👇

PM Kisan e-KYC मुदतवाढ | पहा शेवटची तारीख


आता शेतकऱ्यांना मोबाईल क्रमाकांच्या माध्यमातून आपले स्टेट्स पाहता येणार नाही. आता केवळ आधार आणि बँक खात्याच्या माध्यमातून स्टेट्स जाणून घेऊ शकतात. यापुढे, जर एखाद्या शेतकऱ्याला लाभार्थी किंवा इतर स्टेटस तपासायचे असेल तर त्याला किसान पोर्टलवर आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक द्यावा लागेल.


मोबाईल नंबरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्टेटस चेक करणे सोपे जात होते. पण अनेक लोक कोणत्याही मोबाईल नंबरवरुन स्टेटस चेक करत होते. अनेकवेळा लाभार्थी सोडून अन्य लोक याची माहिती घेत होते. ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे.


पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत (PM-KISAN) प्रत्येक शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. वर्षाला तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे ही मदत दिली जाते. पैसे खात्यात जमा झाले की नाही, याची खात्री शेतकरी 'पीएमकिसान डॉट जीओव्ही डॉट इन' या वेबसाईटवर करता येते.


#PMKisan या योजनेअंतर्गत जारी केलेली एकूण रक्कम सुमारे १.८ लाख कोटींवर पोहोचली आहे. PM-KISAN योजनेची घोषणा फेब्रुवारी २०१९ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या योजनेचा पहिला हप्ता डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीसाठी होता.

हे पण वाचा

👇

पुन्हा एकदा होणार जोरदार पाऊस


पीएम मोदी लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहे

पंतप्रधान शिमला येथे होणाऱ्या "गरीब कल्याण संमेलन" या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 9 केंद्रीय मंत्रालयांद्वारे चालवल्या जाणाऱ्या 16 योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण आणि शहरी), जल जीवन मिशन आणि अमृत, प्रधानमंत्री स्वानिधी योजना, वन नेशन-वन रेशन कार, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत पीएम ना आरोग्य योजना, आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना यावर चर्चा करणार आहेत.


हे पण वाचा

👇

सर्व शासकीय दाखले मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे


Post a Comment

Previous Post Next Post