खुशखबर ! पी एम किसान योजनेचा ११ वा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा

 खुशखबर ! 
पी एम किसान योजनेचा ११ वा हप्ता शेतकर्यांच्या खात्यात जमा | PM Kisan Yojana 11th installment credited to farmers' account

नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी एम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे कारण पी एम किसान योजनेचा ११ हप्ता आज दिनांक ३१ मे २०२२ रोजी जमा झाला आहे. eKYC केलेल्या शेतकर्यांच्या खात्यात  एम किसान योजनेचा हा ११ वा हप्ता जमा झाला आहे. 

PM Kisan Yojana 11th installment credited to farmers' account

महत्वाची अपडेट


१० करोड शेतकऱ्यांना २००० रु. उद्या जमा होणार आहेत. थोडक्यात सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत ज्यांची kyc झाली असेल त्यांना सुद्धा आणि kyc नसेल झाली त्यांना सुद्धा पैसे मिळतील. 


५ करोड शेतकऱ्यांची अजून kyc झाली नाही त्यामुळं KYC सुरूच राहणार असून KYC ची शेवटाची तारीख ३१ जुलै २०२२ आहे.

महत्वाचे

"पी एम किसान योजनेचा हा ११ वा हप्ता फक्त त्याच शेतकर्यांच्या खात्यात जमा झाला आहे ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे अश्याच शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचा हा ११ वा हप्ता जमा झाला आहे.तेव्हा आपल्या खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तपासून पहा आणि जर खात्याला आधार लिंक नसेल तर बँकेशी संपर्क साधून आधार कार्ड लिंक करून घ्यावे.आधार लिंक असेल तरच इथून पुढे पी एम किसान योजनेचे हप्ते भेटतील."


आतापर्यंत शेतकरी रजिस्ट्रेशननंतर आपले स्टेट्स स्वत: चेक करु शकत होते. अर्जाची स्थिती काय आहे, पैसे आले की नाही हे शेतकऱ्यांना पाहता येत होते. आतापर्यंत शेतकरी पीएम किसान पोर्टलवर जाऊन आपला आधार नंबर, मोबाइल अथवा अकाउंट नंबर टाकून पैसे जमा झालेत की नाही याची खात्री करत होते. पण, आता हा नियम लागू होणार नाही.pm kisan 11th installment

 

हे पण वाचा

👇

PM Kisan e-KYC मुदतवाढ | पहा शेवटची तारीख

PM KISAN


आता शेतकऱ्यांना मोबाईल क्रमाकांच्या माध्यमातून आपले स्टेट्स पाहता येणार नाही. आता केवळ आधार आणि बँक खात्याच्या माध्यमातून स्टेट्स जाणून घेऊ शकतात. यापुढे, जर एखाद्या शेतकऱ्याला लाभार्थी किंवा इतर स्टेटस तपासायचे असेल तर त्याला किसान पोर्टलवर आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक द्यावा लागेल.


मोबाईल नंबरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्टेटस चेक करणे सोपे जात होते. पण अनेक लोक कोणत्याही मोबाईल नंबरवरुन स्टेटस चेक करत होते. अनेकवेळा लाभार्थी सोडून अन्य लोक याची माहिती घेत होते. ही सुविधा आता बंद करण्यात आली आहे.


पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत (PM-KISAN) प्रत्येक शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. वर्षाला तीन हप्त्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे ही मदत दिली जाते. पैसे खात्यात जमा झाले की नाही, याची खात्री शेतकरी 'पीएमकिसान डॉट जीओव्ही डॉट इन' या वेबसाईटवर करता येते.


#PMKisan या योजनेअंतर्गत जारी केलेली एकूण रक्कम सुमारे १.८ लाख कोटींवर पोहोचली आहे. PM-KISAN योजनेची घोषणा फेब्रुवारी २०१९ च्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. या योजनेचा पहिला हप्ता डिसेंबर २०१८ ते मार्च २०१९ या कालावधीसाठी होता.

हे पण वाचा

👇

पुन्हा एकदा होणार जोरदार पाऊस


पीएम मोदी लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहे

पंतप्रधान शिमला येथे होणाऱ्या "गरीब कल्याण संमेलन" या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 9 केंद्रीय मंत्रालयांद्वारे चालवल्या जाणाऱ्या 16 योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण आणि शहरी), जल जीवन मिशन आणि अमृत, प्रधानमंत्री स्वानिधी योजना, वन नेशन-वन रेशन कार, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्मान भारत पीएम ना आरोग्य योजना, आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना यावर चर्चा करणार आहेत.


हे पण वाचा

👇

सर्व शासकीय दाखले मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे


Post a Comment

Previous Post Next Post