Maha Dbt Yojana| ट्रॅक्टर, पावर टिलर यंत्र-अवजारे योजना ५० ते ६० टक्के अनुदान | नवीन शासन निर्णय (GR) आला.

 

योजना,महा-डीबीटी,महाराष्ट्र शासन योजना,शेतकरी योजना,

     नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत अतिशय महत्वाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे. राज्यात 2022-23 करिता कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्याबाबत हा शासन निर्णय असून. यामध्ये विविध कृषी अवजारे, यंत्रे, तसेच ट्रॅक्टर, पावर टीलर, मळणी यंत्र, यासाठी अनुदान देण्यात येत आहे. आणि ऑनलाइन अर्ज सुद्धा देखील सुरू झालेले आहेत. तरी ऑनलाईन अर्ज कसे करायचे आहेत. हा कृषी यांत्रिकीकरण संदर्भातील शासन निर्णय काय आहे. ती संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत हा लेख संपूर्ण वाचा.   

 राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना 2022-23 मध्ये राबवण्यासाठी एकूण 240 कोटी निधी मंजूर केला आहे. आणि त्याचबरोबर 56 कोटी रुपये निधी वितरित करण्यात देखील आलेला आहे आणि ह्या योजनेला 2022-23 मध्ये राबविण्यास मंजुरी देण्यात आलेले आहेत. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे यंत्र खरेदीसाठी अनुदान. कृषी अवजारे यंत्रे बँकांना अनुदान देण्यासाठी योजना राबवली जाते. त्यामध्ये सर्व प्रकारचे कृषी अवजारे असतील यंत्र असतील यासाठी आपल्याला अनुदान दिले जाते. या बाबतीतला हा महत्वाचा शासन निर्णय आहे. तर या अंतर्गत आता आपण पाहिलं की वरील सर्व बाबींकरिता हे अनुदान देण्यात येते. परंतु कोणत्या अवजारासाठी कोणते यंत्र साठी किती अनुदान आहे. कोणत्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी किती अनुदान आहे. की संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेली माहिती पहा.


योजना आवश्यक कागदपत्रे

  • शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य
  • शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ चा उतारा
  • शेतकरी अनुसूचित जाती,जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
  • या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेतल्यास पुढील 10 वर्ष अर्ज करता येणार नाही.
  • मात्र, इतर औजारासाठी अर्ज करता येईल.
  • ट्रॅक्टर अनुदान योजना कागदपत्रे 2022
  • आधार कार्ड ७/१२ उतारा ८ अ दाखला
  • खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन 
  • केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  • जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी )
  • स्वयं घोषणापत्र
  • पूर्वसंमती पत्र

कृषी अनुदान योजना 2022 साठी मिळणारे  यंत्र अनुदान -

रेजड बेड प्लांटर (बीबीएफ यंत्र)- 35000/- कल्टीव्हेटर – 50000/- पलटी नांगर हायड्रॉलिक डबल बॉटम – 70000/-. पलटी नांगर हायड्रॉलिक ट्रिपल बॉटम – 89500/- पलटी नांगर मेकॅनिकल डबल बॉटम – 40000/- नांगर मेकॅनिकल ट्रिपल बॉटम – 50000/-. ट्रॅक्टर माउन्टेड/ऑपरेटेड स्प्रेयर (एयर केरियेर/एयर असिस्ट)- 125000/- विडर (पीटीओ ऑपरेटेड). /वीड स्लैशर- 75000/- कॉटन श्रेडर/मॉवर श्रेडर -100000/- Chaff cutter- ( operated by engine/electric motor below 3 hp and power Tiller. and tractor of below 20 hp)- 50 टक्के, 20000/- रु. Manually operated chaff cutter (above 3 feet)- 50 टक्के, रु.6300/-. Manually operated chaff cutter ( upto 3 feet)- 50 टक्के, रु.5000/-. अनुदान – इतर लाभार्थी यांना 40 टक्के देण्यात येते. (कृषी विभाग योजना 2022)


ट्रॅक्टर व कृषी अवजारे यंत्रे योजना अनुदान - 

अल्प/अत्यल्प/महिला/अज/अजा (50 टक्के)- अ.ट्रॅक्टर (08-70 पीटीओ एचपी) -125000/- ब. पॉवर टिलर 8 बीएच पी पेक्षा कमी – 65000/- 8 बीएचपी व त्यापेक्षा जास्त – 85000/- क. स्वयंचलित अवजारे रिपर कम बाइन्डर (3 व्हील) – 175000/ रिपर कम बाइन्डर (4 व्हील) – 250000/- रीपर – 75000/- पॉवर वीडर (2 बीएचपी पेक्षा कमी इंजीन ऑपरेटेड ) – 25000/-  पॉवर वीडर (2 बीएचपी ते 5 एचपी इंजीन ऑपरेटेड ) – 35000/- पॉवर वीडर (5 बीएचपी पेक्षा जास्त इंजीन ऑपरेटेड) – 63000/- ड. ट्रॅक्टर (35 बिएचपी पेक्षा जास्त) चलित अवजारे रोटाव्हेटर 5 फुट – 42000/- रोटाव्हेटर 6 फुट – 44800/- थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा कमी) – 100000/- थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर (क्षमता 4 टन प्रती तास पेक्षा जास्त) – 250000/- पेरणी यंत्र (सीड ड्रिल 9 दाती व त्यापेक्षा जास्त) – 20000 rs.

नवीन शासन निर्णय(GR) पहा 👉 शासन निर्णय (GR)

धन्यवाद🙏, माहिती आवडल्यास नक्की इतरांना share करा.






Post a Comment

Previous Post Next Post