Pm Kisan Yojana eKYC करून घ्या| 11 वा हप्ता या दिवशी जमा होणार.

 

PM KISAN YOJNA
 नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची माहिती समोर येत आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा ११ वा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आणि राज्य सरकारने या संबंधीतील यादी ही केंद्र सरकारला पाठवली आहे. तरी या बाबतीतला संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 1 डिसेंबर 2018 रोजी भारत सरकारने संपूर्ण देशभरात सुरु केली आहे. आत्ता पर्यंत प्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत दहा हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे. आता या योजेनेद्वारे नोंदणीकृत शेतकर्यांना १० हप्ते मिळाले आहेत व अत्ता प्रतीक्षा आहे ती म्हणजे ११ व्या हप्त्याची तर शेतकर्यांना लवकरच ११ वा हफ्ता मिळणार आहे. ११ व्या हप्त्याबाबत कामकाज राज्य सरकारने चालू केले आहे. म्हणजेच आरएफटी साइन करून केंद्र सरकार कडे पाठविले आहे.सर्व शेतकऱ्यांना eKYC करणे अनिवार्य आहे या लेखात पाहणार आहोत.

हे पण वाचा

👇

किसान क्रेडिट कार्ड २०२२ चे वाटप लवकरच होणार सुरू | लवकर अर्ज करा | KCC

    सर्व नोंदणीकृत लाभार्थी शेतकरी 11 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असतानाही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी साठी eKYC ची अंतिम मुदत काही दिवसांनी वाढवण्यात आली आहे. अनेक अहवालांनुसार ही रक्कम येत्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असा अंदाज आहे.  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी eKYC ची अंतिम मुदत ३१ मे २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत ११ व्या हप्त्याच्या वितरणाबाबत सरकार अध्याप कोणतीही तारीख स्पष्ट केलेली नसली तरी, या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांचा २,००० रुपयांचा हप्ता लवकरच मिळू शकेल, जो त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. मागील वर्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी हप्ता १५ मे रोजी हस्तांतरित करण्यात आला होता. त्यामुळे यावर्षी शेतकरी १५ व्या हप्त्याची अपेक्षा करू शकतात.

  • eKYC करणे अनिवार्य

सर्व Pm Kisan योजनेचा लाभ घेत असलेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना eKYC करणे अनिवार्य आहे.
PM KISAN EKYC

PM KISAN 
PM Kisan योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्व नोंदणीकृत लाभार्थी शेतकऱ्यांनी eKYC करणे अनिवार्य आहे आणि ही eKYC ची मुदत 31 मे 2022 पर्यंत असून ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी अजून eKYC केली नसेल त्यांनी eKYC लवकरात लवकर करून घ्यावी अन्यथा पुढील लाभ मिळण्यास अडथळे येऊ शकतात.

  • Pm Kisan eKYC कशी करायची?
eKYC दोन प्रकारे करता येते
  1. आपण स्वतः आपल्या मोबाईल वरून करू शकतो.(या साठी आपल्या आधार कार्ड ला आपला चालू मोबाईल नंबर लिंक असायला हवा.)
  2. आपण आपल्या जवळील CSC CENTER ला भेट देऊन आपण eKYC करू शकतो. आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसला तरीही आपण CSC सेंटर मध्ये जाऊन आपली eKYC करू शकतो.
  • Pm Kisan eKYC साठी आवश्यक
  1. आधार कार्ड
  2. मोबाइल नंबर (OTP साठी)
  3. आपण स्वतः (thumb impression साठी)

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची लाभार्थी स्थिती तपासणे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या. 👉 लिंक

 लाभार्थी स्थिती (Beneficiary Status) वर क्लिक करा.

एक नवीन पृष्ठ दिसेल.

दिलेल्या पर्याय  मधून एक पर्याय निवडा म्हणजे आधार क्रमांक, खाते क्रमांक.

निवडलेले तपशील प्रविष्ट करा आणि ते सत्यापित करा.

त्यानंतर “ डेटा मिळवा ” बटण दाबा.

तुम्हाला शेतकरी लाभार्थी स्तिथी दिसेल.


टीप :- ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची eKYC अध्याप केली असेल तर त्वरित करून घ्यावी.


धन्यवाद🙏, माहिती आवडल्यास नक्की इतरांना share करा.








Post a Comment

Previous Post Next Post