किसान क्रेडिट कार्ड २०२२ चे वाटप लवकरच होणार सुरू | लवकर अर्ज करा | KCC

    नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड हे हे शेतकऱ्यांसाठी खूप उपयोगी अशी केंद्र सरकारची योजना आहे. किसान क्रेडीट कार्ड वर ३ लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्यांना अत्यल्प व्याजदरावर मिळते ( वार्षिक व्याजदर ४% ते ७% आहे). ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ मिळतो ते सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता. 

किसान क्रेडिट कार्ड २०२२


टीप :- किसान क्रेडिट कार्ड योजने संदर्भात संपूर्ण माहिती मागील लेखात दिलेली आहे तरी आपण ती अवश्य वाचावी.

👇

किसान क्रेडिट कार्ड योजना संपूर्ण माहिती



किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट चे वाटप सुरू होणार अश्या प्रकारचे संदेश मोबाईल वर येण्यास सुरुवात झाली असून लवकरच या योजनेचे किसान क्रेडिट कार्ड वाटप चे कामकाज लवकरच सुरू होईल . तरी ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर किसान क्रेडिट कार्ड चा नोंदणी अर्ज भरून घ्यावा. आणि ज्या शेतकऱ्यांनी अगोदरच अर्ज भरलेलं असतील त्यांना या योजने अंतर्गत लवकरच कार्ड चे वाटप सुरू होईल. आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर मॅसेज द्वारे आपल्याला कळविले जाईल.



अर्ज कोठे करावा ?

     किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी चा अर्ज तुमच्या जवळील CSC Center मध्ये जाऊन भरावा.

     तसेच  बँक मध्ये जाऊनही या योजनेसाठी अर्ज करू शकतो.

किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक.

  • किसान क्रेडिट कार्ड योजनेसाठी अर्ज करणारा शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ असला पाहिजे.
  • आधार कार्ड
  • मोबाइल नंबर
  • ७/१२ व ८ अ 

महत्वाची लिंक

 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 👉लिंक

 किसान क्रेडिट कार्ड योजना                 👉लिंक


पुढील लेखात आम्ही किसान क्रेडिट कार्ड योजनेचा अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती देणार आहोत.


धन्यवाद🙏, माहिती आवडल्यास नक्की इतरांना share करा.





हे पण वाचा


Post a Comment

Previous Post Next Post