महा-डीबीटी MAHA-DBT शेतकरी योजनांची लॉटरी लागली| तुम्हाला Msg आला का

      नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महा- DBT हे पोर्टल सुरू केले असून या पोर्टलद्वारे शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ सरकार देत आहे. शासनाच्या विविध योजनांचे अर्ज कृषी विभाग,  जिल्हा परिषद या विभाग योजनांचे अर्ज या पोर्टल वर स्वीकारले जातात. शेतकऱ्यांनी या पोर्टल वर अर्ज सादर केल्यास सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांची याची टप्या टप्याने जाहीर केली जाते. ही यादी लॉटरी पद्धतीने काढली जाते. शेतकऱ्यांची लॉटरी मध्ये निवड झाल्यास त्या शेतकऱ्यांने पोर्टल वर अर्ज सादर करताना नोंदणी केलेल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर एक संदेश पाठवला जातो व त्या संदेशद्वारे शेतकऱ्यास योजना मंजूर झाली आहे हे कळविले जाते.



हे पण वाचा 

👇

 महाराष्ट्र शासन कृषी योजना 2022-23 | कृषी विभाग योजना 2022

    महा:-DBT पोर्टल वर काल दि.२८ एप्रिल रोजी सन २०२२/२३ वर्षासाठी अर्ज केलेल्या योजनांची लॉटरी लागली असून त्याचे मॅसेज हे शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत तसेच आजही काही शेतकऱ्यांना लॉटरी चे मॅसेज आलेले आहेत आणि या २ ते ३ दिवसात  शेतकऱ्यांना मॅसेज मोबाइल वर मिळतील. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी योजनेसाठी अर्ज सादर केले होते त्या शेतकऱ्यांना मॅसेज येण्यास सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांना मॅसेज आलेले आहेत त्यांनी पोर्टल वर कागदपत्रे अपलोड करून घ्यावी.



महा-DBT लॉटरी मध्ये आपले नाव कसे चेक करावे?

 महा - DBT पोर्टलवर लॉटरी मध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड होते त्यांना मॅसेज द्वारे कळविले जाते आणि काही तांत्रिक अडचणीमुळे जर आपल्याला मॅसेज प्राप्त नसेल झाला आपण महा - DBT पोर्टल वर आपला युसर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन केल्यास सर्व अर्जाची स्थिती माहिती करून घेता येईल. ज्या अर्जासमोर Winner असे नाव आहे त्या योजनेसाठी आपली निवड झाली आहे.


धन्यवाद🙏, माहिती आवडल्यास नक्की इतरांना share करा.

हे पण वाचा

👇

PM किसान योजना eKYC आत्ता करा घरच्या घरी | PM Kisan eKYC





हे पण वाचा







Post a Comment

Previous Post Next Post