अरबी समुद्रात मौसमी पाऊस दाखल |अनेक भागात मौसमी पाऊसास सुरुवात

     या वर्षी कडक उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांचा उन्हाळा त्रासदायक गेला. पण मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी पावसाळा लवकर सुरू होणार असल्याने सामान्य नागरिक, लहान मुले, शेतकरी बांधवांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे.

संकल्प मराठी


अंदमान निकोबार, केरळ नंतर आता नैऋत्य मोसमी पावसाचा प्रवास महाराष्ट्राकडे झाला आहे. मोसमी पाऊस अखेर अरबी समुद्रात दाखल झाल्याने आता राज्यात पूर्व मोसमी पावसाची बरसात सुरू झाली आहे. (Maharashtra Rain Update News)

महाराष्ट्रात (Maharashtra) मागील काही तासांपासून पाऊस पडत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामध्ये विदर्भ, मराठवाडा, कोकण यांचा समावेश आहे. या भागात वादळी पाऊस सुरू आहे. फळबागांचे नुकसान झाल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.

हवामान खात्याने दर्शवलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरातून वाहत असलेल्या बाष्पयुक्त वार्‍यांमुळे पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागराच्या जोडीला अरबी समुद्रातही बाष्पयुक्त वारे वाहत असल्याने कोकणकिनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग येथे वादळी वारे आणि पावसाचा जोर वाढला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post