MPSC EXAM : 161 पदांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग २०२२ साठीची पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट २०२२ ला होणार.

   

MPSC

 राज्य सेवा आयोगाची 2022 साठीची पूर्व परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. या अंतर्गत एकुण 161 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या जाहिराती संदर्भात माहिती दिली आहे. राज्यातल्या 37 केंद्रांवर राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार आहे. वित्त आणि लेखा सेवा गट अ सहाय्यक संचालक, नगरपालिका- नगरपरिषद मुख्याधिकारी गट अ, राज्य उत्पादन शुल्क विभाग गट ब या आणि बालविकास विभागाच्या पदांसाठी ही पूर्वपरीक्षा घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या या पूर्व परीक्षेत गट 'अ' मध्ये 59 आणि गट ब मध्ये 14 पदांसाठी तसेच इतर 88 पदांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. 21 ऑगस्ट 2022 रोजी पूर्व परीक्षा पार पडल्यानंतर जानेवारी 2023 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र असतील. 21 जानेवारी ते 23 जानेवारी किंवा त्यानंतर आयोगाकडून मुख्य परीक्षा आयोजित करण्यात येईल.

इच्छुक उमेदवार https://mpsc.gov.in या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन अर्ज तरु शकतात. 12 मे म्हणजेच आजपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. 1 जून 2022 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख आहेत. तोपर्यंत अधिकृत संकेतस्थावर अर्झ करता येतील. राज्य शासनाच्या अधिसुचनेनुसार 1 मार्च 2020 ते 17 डिसेंबर 2021 या कालावधी दरम्यान अधिक वय असलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र असतील. कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या भरती अंतर्गत नगरपालिकांमधील मुख्याधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागातील सहाय्यक आयुक्त, बालविकास प्रकल्प अधिकारी, तसेच इतर पदांसाठी 161 पदांवर भरती करण्यात येणार आहे.


पदांचा एकूण तपशील पुढीलप्रमाणे :

 


क्रमांक पदाचे नाव पद संख्या
१. सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा ०९
२. मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद २२
३. बाल विकास प्रकल्प अधिकारी २८
४. सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क ०२
५. उप अधीक्षक, राज्य उत्पादन शु्ल्क ०३
६. कक्ष अधिकारी ०५
७. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ०४
८. निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था व अन्य ८८
एकुण पदे १६१



सविस्तर माहिती पुढील जाहिरात वाचा 

👇

MPSC-महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२२ (१६१ जागा)



Post a Comment

Previous Post Next Post